अकोला : जवाहर नवोदय विद्यालय येथे शैक्षणिक सत्र 2022-23 करीता इयत्ता सहावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाले आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने दि. 30 नोव्हेंबरपर्यंत करण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर.एस. चंदनशिव यांनी केले आहे.
प्रवेशाकरीता पात्रता : जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकलेला असावा, विद्यार्थी-विद्यार्थीनी इयत्ता तिसरी व चौथी पूर्ण शैक्षणिक सत्र सलगपणे सरकारमान्य शाळेतून उत्तीर्ण असावा, तसेच विद्यार्थ्यांचे इयत्ता पाचवीचे पुर्ण शैक्षणिक सत्र अकोला जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत झालेला असावे, विद्यार्थ्यांचा जन्म दि. 1 मे 2009 ते दि. 30 एप्रिल 2013 (दोन्ही दिवस धरुन) या कालावधीत झालेला असावा.
पालकांनी शाळेच्या मुख्याधापकांच्या सही शिक्यानिशी माहिती भरलेले फार्म आधार कार्ड व पासपोर्ट फोटो घेवून ऑनलाईन प्रवेश अर्ज करावा. प्रवेशासंबंधी माहितीकरीता www.navodaya.gov.in/nvs-school/AKOLA/en/homeschool/AKOLA/en/home या संकेतस्थळाव पाहावे. तसेच अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय बाभूळगांव जहॉ.,अकोला येथे किंवा ए.पी.गेडाम-9518942431, मिलिंद बनसोडे-9822236122, विनय नेवे- 9423282260, निलिमा गावंडे-9922941371 यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.