अकोला : सहकारी गृहनिर्माण संस्थेत ई वर्गातील संस्था म्हणजेच 250 पर्यत किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या संस्थेची दि. 1 सप्टेंबर 2021 ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीकरीता निवडणूकीव्दारे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पॅनल तयार करण्याकरीता दि. 20 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज शासकीय विभागातील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कार्यरत अधिकारी-कर्मचारी (वरीष्ठ लिपीक किंवा त्यापेक्षा जादा दर्जा असलेला कर्मचारी), प्रमाणीत लेखापरिक्षक, पाच वर्ष कामकाजाचा अनुभव असणारे वकील, शासकीय किंवा स्थानिक संस्थेकडून निवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचारी (वयाची 65 वर्ष पेक्षा जास्त नसलेल्या) यांचेकडून मागविण्यात येत आहेत.
विहित नमून्यातील अर्ज दि. 20 ऑक्टोंबर 2021 पर्यत (शासकीय सुटीचे दिवस वगळून) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सहकार संकूल, आदर्श कॉलनी, अकोला या कार्यालयात येथे मिळू शकतील. तसेच विहित नमून्यातील अर्ज, अटीशर्ती, अर्जदाराचे प्रतिज्ञापत्राचा नमूना कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आले आहे.


