अस्वलाच्या हल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/कमलापुर- अहेरी तालुक्यातील अती दुर्गम भाग असलेले कमलापुर परिसरात अस्वलांचा धुमाकुळ सुरू असल्याने परिसरातील नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.कमलापुर येथील अत्यंत गरिब कुटुंबातील असलेले नरसिम्हा चौधरी वय 55 वर्षे हे दि.1आक्टोबर 2021 रोजी सकाळी गावातील जवळपास च्या जंगलात गाई चारण्याकरिता गेले होते.त्यावेळी अस्वलाने प्राणघातक हल्ला करून जखमी केले.त्यांनी कसेतरी करून अस्वलाच्या तावडीतुन आपली सुटका करून घेतली.इतर नागरिकांच्या मदतीने त्याला कमलापुर येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात उपचारा करिता भरती करण्यात आले.हि घटना आज दुपारी तिन वाजता उघडकिस आली.त्या नंतर पुढिल उपचाराकरिता उपजिल्हा रूग्णालय अहेरी येथे पाठविण्यात आले.तरी वनविभागाकडुन सदर व्यक्तीस आर्थीक मदत करावी अशी मागणी केली आहे.