श्रद्धा गढे
शहर प्रतिनिधी तेल्हारा
अकोट- राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अकोट-लोहारी मार्गावरील मोहाडी नदीच्या शिकस्त झालेल्या पुलाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला आज निवेदन दिले .हे निवेदन दिल्यानंतर लगेच सां.बा विभागाचे अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन या पुलावरील जीवघेणे खड्डे बुजवण्यात येतील तसेच नव्याने पूल बांधकाम करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे लेखी आश्वासन दिले आहे. अकोट ते लोहारी मार्गावरील नदीवरील पुल सध्या खचलेला आहे. हा पूल कोणत्या क्षणी कोसळून दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. या रस्त्यावर औद्योगिक वसाहतीतील ट्रकांची नेहमीच ये जा सुरू असते .या सोबतच या मार्गावर लोहारी ,तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक नियमित ये-जा करतात .या पुलावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत .त्यामुळे वाहन धारकांना त्रास सहन करावा लागतो. सध्या पावसाळ्या चे दिवस असून नदीला आलेल्या पुरामुळे पाणी वाहते .त्यामुळे अनेक वेळा रस्ता बंद असतो. त्यामुळे वाहतूक खोळंबतो, हा पूल नव्याने बांधण्यात यावा त्याची उंची वाढवण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी युवक कांग्रेस तीव्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष राम म्हैसने यांनी निवेदनाद्वारे दिला.या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राम म्हैसने , सुमित ठाकुर, ज्ञानू कुलट, पप्पू उर्फ प्रवीण गावडे, विपुल ठाकरे, जयदीप चाऱ्हाटे, प्रफुल म्हैसने, सागर म्हैसने, रवि म्हैसने, वैभव पोटे,मोहित अहीर, शुभम देशमुख,प्रफुल गिरी, अवि डिक्कर, रोहन अहिर, निवृत्ती वसु, आशुतोष चोपडे, कृष्णा बोदडे, ज्ञानू खोंड, मयूर बरोबरे,ओम हंडाळ, सुमित म्हैसने, अभिषेक डीक्कर आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अकोट-लोहारी मार्गावरील नदीचा पूल नव्याने बांधण्याबाबत आज निवेदन दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी लेखी पत्र देऊन सदर पुलाचे बांधकाम तात्काळ करण्यात येईल . असे कळविले आहे.त्यासोबतच नवीन पुलाबाबत प्रस्ताव पूरहानी कार्यक्रम अंतर्गत पाठविण्यात आला असल्याचे लेखी आश्वासन सां.बा विभागाने राम म्हैसने यांना दिले आहे.