गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :- तालुक्यात निर्माण झालेला मोठा प्रश्न चहूकडे चे तालुक्यातील मुख्य रस्ते हे नाहीतच आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पण आता रस्त्याच्या झालेल्या दुरवस्था मुळे परिवहन मंडळाला सुद्धा कुठेतरी थांबा घ्यावा लागत आहे.म्हणजे सविस्तर असे की ज्यावेळी रस्त्यावर परिवहन मंडळाच्या बसेस धावतात त्यावेळी रस्त्यात झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आगार चे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.एसटी कर्मचाऱ्याला वाहन चालविताना सततची कसरत करावी लागत आहे. व आपल्या सोबतच कितीतरी प्रवाशांचे जीव हातात घेऊन कर्मचारी या खड्डेमय रस्त्यावरून आपली अविरत सेवा प्रवाशांना देत आहे. कारण जर आगार बंद पडले तर विद्यार्थी वर्ग, व्यापारी वर्ग व सोबतच कित्येक शासकीय अधिकारी या बसने रोजही प्रवास करतात, तर यांची गैरसोय होऊ नये म्हणूनच तेल्हारा आगार आपले नुकसान बघून सुद्धा प्रवाशांच्या हितासाठी धावपळत आहे. पण कुठपर्यंत हे सगळे चालणार म्हणून आता दोन दिवस अगोदरच तेल्हारा आगार वरून धावणारी, तेल्हारा निंबा (भौरद) मार्गे अकोला ही बस सेवा बंद करण्यात आली. कारण सतत च्या होणाऱ्या नुकसानाला आता आगार सामोरे जाऊ शकत नाही. अशी स्थिती येऊन पडली आहे. व आता तेल्हारा ते बेलखेड हा मार्गही बंद पडायच्या परिस्थितीत आलाय.कारण रोडच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे बस सेवा देणे आता आगाराला परवडत नसल्याचे चित्र आपल्यासमोर आले आहे.सदर प्रकरणात तेल्हारा आगार व्यवस्थापक यांच्यासोबत चर्चा केली असता. त्यांचे मनोगत असे की त्यांनी वारंवार बांधकाम विभागाला रोड च्या बाबतीत पत्रव्यवहार केले असता सतत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. जी बस सेवा बंद करण्यात येत आहे. ते स्वतः आगाराने बंद न करता डिव्हिजन ऑफिस कडून आलेल्या ऑर्डरनुसार बस सेवा बंद करण्यात येत आहेत.संबंधित बांधकाम विभागाने आता तरी जागे व्हावं आणि जे चित्र रोड संबंधित आपल्या तालुक्याचे सामोरे येत आहे, कुठेतरी यामध्ये सुधारणा करावी नाहीतर तेल्हारा तालुक्याचे एक दिवस सर्वच कारभार ठप्प होऊन विकास या शब्दाला जागाच राहणार नाही. म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती उपाययोजना करून द्यावी.











