महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.10 :- भद्रावती तालुक्यातील मौजा कोकेवाडा (मानकर) या गावातील जिल्हा परिषद शाळेला नवीन इमारत मंजूर झाली असून त्या करिता जुनी इमारत पाडण्यासाठी लिलाव करण्यात आला होता. परंतू सदर इमारतीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्राम पंचायत सदस्य रोशन मानकर आणि गावक-यांनी केला आहे.सदर इमारत ही लिलाव झाल्या पासून 15 दिवसात पाडण्याचे ठरवले असताना देखील आज 3 महिने लोटून गेले तरी काम अपूर्ण अवस्थेत आहे. या इमारतीवरील फक्त कौले आणि फाटे इतकेच काढण्यात आले आहे. बाकी सर्व इमारत जशाच तशी आहे. यामुळे गावक-यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे सदर काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात यावे जेणेकरून इमारत बांधकाम लवकर होईल.याकडे सरपंचांनी लक्ष देऊन सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणीही रोशन मानकर व गावातील नागरिकांनी केली आहे.याबाबत सरपंचाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.


