लातूर परिघावरील आवाजडॉ.अनिल जायभाये
जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर/परिघावरील आवाज हा संपादित ग्रंथ लातूर शहरातील वास्तव आणि प्रश्न यांची मांडणी करणारा एक महत्वाचा सामाजिक व सांस्कृतिक दस्ताऐवज आहे असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, उपकेंद्र लातूर येथील सामाजिक शास्त्रे संकुलातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.अनिल जायभाये यांनी केले रोटरी क्लब ॲाफ लातूर होरायझन द्वारा आयोजित बौद्धिक व्याख्यानात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष डॉ.संजय गवई हे होते तर सचिव निळकंठ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ.अनिल जायभाये म्हणाले की, लातूर: परिघावरील आवाज हा एक विद्यार्थी, नागरिक आणि शिक्षक यांच्या सहकार्याने केलेला संशोधन प्रकल्प असून तो शर्मिला रेगे (पुणे) आणि ना.य.डोळे (उदगीर) यांना समर्पित केला आहे.
या ग्रंथाला भारतीय साहित्य समीक्षक आणि भाषा भाषा शास्त्रज्ञ गणेश देवी (धारवाड) कर्नाटक, यूनिवर्सिटी ऑफ मिंनेसोटा (यु.एस.ए.) येथील प्रोफेसर ऋचा नागर आणि विचार शलाकाचे संपादक डॅा.नागोराव कुंभार यांचे मनोगत लाभले आहे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमामध्ये प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे, डॅा.मल्लिकार्जुन हुलसुरे आणि बी.पी. सूर्यवंशी यांनी मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना डॅा.संजय गवई म्हणाले की, या ग्रंथातील भाग एकमध्ये लातूरची
सांस्कृतिक-सामाजिक जडणघडण या विषयावर एकूण १२ लेख, भाग दोनमध्ये राजकारण आणि शहर या विषयावर ०४ लेख, भाग तीनमध्ये लिंगभाव आणि शहर या विषयावर ०७ लेख, तर भाग चारमध्ये शहराच्या विकासातील अंतर्विरोध यावर १९ लेख आणि भाग पाचमध्ये जात जमाती आणि शहर यामध्ये ०३ लेख असे एकूण ४५ लेखांचा अंतर्भाव असून प्रा.पंचशील डावकर, महेश गुंड व किरण पवार यांचे सहकार्य लाभले आहे त्यामुळे आपण या ग्रंथाची पुर्व नोंदणी करावी असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा कांबळे यांनी केले तर अतिथी परिचय डॅा.शिवप्रसाद डोंगरे यांनी करून दिला तर आभार माधव पांडे यांनी मानले.











