महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.२० : तालुक्यातील चंदनखेडा येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय व नेहरू युवा केंद्राद्वारे स्वच्छता पखवाडा मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रतिसाद म्हणून जिल्हा युवा अधिकारी शमशेर सुभेदार यांच्या मार्गदर्शनाने व राष्ट्रीय युवा समन्वयक यांच्या देखरेखीखाली विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ व माधवराव महाराज बुहुउददेशीय संस्था चरूर (धारापूरे) यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र चंदनखेडा येथे संस्थेचे सदस्य तथा परिसरातील युवकांकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमातंर्गत युवकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली व परिसरातील प्रमुख आरोग्य केंद्र असल्याने येथे नागरिकांची सतत वर्दळ राहत असल्याने या परिसराची यावेळी पुर्णता स्वच्छता करण्यात आली . याप्रसंगी विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळाचे अध्यक्ष महेश वामनराव केदार ,इतर सदस्य पंढरी हनवते.प्रमोद कोसुरकार,सुधाकर दोडके, रामदास जांभुळे,खडसंग,पाठक, अविनाश हनवते,वैभव नन्नावरे,निखिल हनवते व सर्व पदाधिकारी, आरोग्य अधिकारी डॉ.संतोष झाडे व कर्मचारी उपस्थित होते.