महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.२०:-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील मुधोली येथील जि.प.शाळेला लिंबन रिसार्ट मुधोली कडून संगणक संच भेट म्हणून देण्यात आले.यावेळी मुधोलीचे सरपंच बंडू पाटील नन्नावरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव धारणे, उमेश नन्नावरे, कृषीमित्र हनुमान राणे, राजकुमार घरत, समिर शेख, नाना गजभे, जितू पेंदाम उपस्थित होते.


