अविनाश पोहरे / ब्युरो चिफ,अकोला
पातुर : एक लोकप्रिय म्हण आहे की जी सर्वांनी अनेकदा ऐकली आहे ती म्हणजे ‘एक फोटो हजार शब्दांप्रमाणे असते’ ही म्हण जागतिक फोटोग्राफी दिनामागील मूळ कल्पना चांगल्या प्रकारे समजून सांगू शकते. हा दिवस दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. फोटोग्राफी उत्साही जगभरातून एकत्र येऊन फोटो काढण्याची कला साजरा करतात. फोटोग्राफीच्या विज्ञानाने संपूर्ण मानवी इतिहासात महत्वाची भूमिका बजावली आहे. आज आपल्याकडे ऐतिहासिक क्षणांच्या नोंदी आहेत कारण ते छायाचित्रांमध्ये टिपले गेले आहेत आणि ते कायमचे पाहिले जाऊ शकतात. फोटोग्राफी अभिव्यक्ती, भावना, कल्पना आणि क्षण ताबडतोब कॅप्चर करू शकते आणि भावी पिढ्यांसाठी साठवून ठेवता येऊ शकते.हेच निसर्गातील सुंदर क्षण प्रा. भास्कर काळे यांनी आपल्या कलात्मक फोटोग्राफी मधुन टिपण्याचे उत्कृष्ट कार्य करुन सर्वत्र निसर्ग प्रेमी फोटोग्राफर म्हणून आगळी वेगळी ओळख निर्माण केलीआहे. प्रा.भास्कर काळे देशभक्त उच्च माध्यमिक विद्यालय तांदळी खुर्द येथे इंग्रजी चे प्राध्यापक असून सोबतच ते पर्यावरण व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध समजउपयोगी योजना राबवतात. पाणी फाउंडेशन व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक गावांत कार्य केले आहे. याशिवाय त्यांना फोटोग्राफी चा छंद आहे त्यांनी पातूर तालुका परिसरातील अनेक निसर्गरम्य ठिकाणी जाऊन फोटोग्राफी च्या माध्यमातून त्या ठिकाणांना प्रसिद्धी मिळवून दिली यामध्ये पातूर तलाव, मोर्णा डॅम,धोधानी धबधबा, मोर्णा नदीवरील यु टर्ण,अश्या अनेक ठिकाणांना वर्तमानपत्रात प्रसिद्धी दिली सोबतच विविध तलावावर आढळून येणाऱ्या पक्ष्याची छायाचित्रे काढलेली आहेत व ते फोटो सर्वच सामाजिक माध्यमांवर सर्वदुर प्रसिद्ध करुन तालुक्यातील सर्व स्थळांना प्रेक्षणीय स्थळांचे स्वरुप प्राप्त करून दिले.आज फोटोग्राफी दिन सर्व जगभर साजरा केला जातो त्यानिमित्त माझ्या सर्व फोटोग्राफर मित्रांना फोटोग्राफी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा …!
प्रा. शंकर तु. गाडगे वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात पातूर