बुलडाणा,(जिमाका) दि. 13 : मागील जवळपास दीड वर्षापासून कोरोना विषाणूने संपूर्ण मानव जातीवर आपले अधिराज्य गाजविले आहे. यामधून बुलडाण जिल्हाही सुटला नाही. पहिली लाट, दुसरी लाट कोरोना संसर्गाने अक्षरश: हेलकावे मारून गेली. यामध्ये बऱ्याच जणांना आपले प्राण गमवावे लागले. दुसऱ्या लाटेत दररोज 1300 रूग्ण निघाले. आज मात्र शासनाने आरोग्य विभाग व प्रशासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपाय योजनांमुळे नवीन कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ‘शून्य’ झाली आहे. आज एकही बाधीत रूग्ण जिल्ह्यात आढळला नाही.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2527 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2527 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 0 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 697 तर रॅपिड टेस्टमधील 1830 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2527 अहवाल निगेटीव्ह आहेत.
तसेच आज 08 रुग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 663188 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86620 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86620 आहे.
आज रोजी 1474 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 663188 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87351 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86620 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 67 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.


