सार्वजनिक बांधकाम उपविभागाला दिला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर – चिमूर तालुक्यातील जांभुळघाट-आंबेनेरी भिसी रोडवर खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. व या खड्यांमुळे विध्यार्थ्यांना शेतकऱ्यांना व शेतमजुरांना व प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरीपण याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी जांभुळघाट-आंबेनेरी भिसी या मार्गाची दुरुस्ती करून त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. व सार्वजनिक बांधकाम उपविभागाला निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही दिला आहे. ह्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. व हे रस्तावरील खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. या मार्गाने जांभुळघाट, पारडपार, आंबेनेरी, बोरगाव बुट्टी, कपर्ला भिसी शेतकरी व शेतमजूर व अन्य प्रवासी जात असतात. व हा मार्ग चिमुर वरून उमरेड ला जाण्यास मुख्य मार्ग आहे. तरी मात्र या रस्त्याकडे सर्वांजिक बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष होत आहे. तरी जांभुळघाट-आंबेनेरी भिसी या मुख्य मार्गाची व रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून उपाययोजना करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय चिमुर येथे देण्यात आले. यावेळी आंबोली ग्रामपंचायत सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे, सामाजिक कार्यकर्ते मनोज राऊत, भाग्यवान नंदेशवर, आशिष बोरकर, निलेश गावंडे, अमर ठवरे, संदीप बन्सोड, प्रफुल तांबे, संजय खोब्रागडे किशोरजी गेडाम, निलेश कोहिचाडे, रशिया पोपटे, शुभम टेंभुर्ण उपस्थित होते.