देश की बात फाऊंडेशन अंतर्गत प्रथमच राष्ट्रीय पातळीवर कार्यक्रम
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
आयोजित करून 15 अगस्त की शाम एक दियां शहीदों के नाम”
हा उपक्रम 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहीद जवानांचे स्मरण करून पार पाडण्यात येईल.
फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दिल्लीचे कॅबिनेट मंत्री माननीय गोपाल राय यांच्या पुढाकाराने युवा पिढीमध्ये एक प्रेरणा म्हणून भारतीय शहीद जवानांच्या त्यागाला आत्मसात करून अनुसरावे व वंदन करावे, हा या उपक्रमाचा उद्देश असेल.
कार्यक्रमाच्या रुपरेषेमध्ये सकाळी सत्रामध्ये झेंडावंदन केले जाईल व तदनंतर संपूर्ण देशपातळीवर आपल्या स्थानिक ठिकाणी संध्याकाळी सगळे नागरिक शहीद जवानांच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलन करून आदरांजली अर्पित करतील.
ज्या जवानांनी आपले सर्वस्व देशासाठी त्यागीले त्यांच्या कुटुंबियांना आदरार्थी या उपक्रमास देश की बात फाऊंडेशन तर्फे आमंत्रित केले जाईल.या उपक्रमात जनतेची भाषणे व आपले अनुभव सांगण्यास प्राधान्य दिले जाईल.सायंकाळ च्या सत्रामध्ये अध्यक्ष माननीय गोपाल राय हे ऑनलाइन भाषणाद्वारे जनतेशी संवाद साधतील व स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहिद जवानांना श्रद्धांजली वाहून संबोधन करतील.
कार्यक्रमाविषयी बोलत असताना फाऊंडेशन चे केंद्रीय समन्वयक महेश सामंत व विदर्भ समन्वयक शुभम अंभोरे यांनी एकमताने विधान केले की, आजच्या बऱ्याच युवकांशी बोलत असतांनी असे निदर्शनास आले की, जवानांच्या त्याग व बलिदानाची जाणीव बऱ्याच जणांना नाही आहे.त्या अनुषंगाने आपल्या भावी पिढीला त्यांचा त्याग व बलिदानाविषयी प्रबोधन करणे व आदरांजली देणे हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू असेल.कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकीकरण बळकट होईल,समाजास संघर्षगाथा अनुभवण्यास मिळेल.तसेच कार्यक्रमाचे आयोजन करतांना कोविड-19 महामारी संबंधित सर्व पूर्वसूचना बाळगून व्यवस्थापन करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.
जर कोरोना महामारी च्या कारणाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात व्यत्यय आला तर सगळ्यांनी आपल्या घरून दीप प्रज्वलन करून शहिदांना आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन शुभम अंभोरे यांनी केले.
देश की बात फाऊंडेशन ची स्थापना 2018 मध्ये दिल्ली येथे करण्यात आली.2019 पर्यंत फाऊंडेशन चा प्रसार संपूर्ण देशासह विदेशापैकी 16 अन्य देशामध्ये झाला.फाऊंडेशन चा मुख्य उद्देश देशातील युवकांमध्ये राष्ट्रभक्ती व सकारात्मक राष्ट्रवाद रुजविणे हा आहे.तसेच स्वातंत्र्याच्या 70 वर्ष पश्चातही आपला देश सामाजिक व आर्थिकदृष्ट्या पछाडलेला आहे म्हणून सामाजिक,राजकिय व आर्थिक प्रबळीकरणाचे धडे युवकांमध्ये रुजविणे व पुनरुज्जीवित करणे यावर भर दिला गेला आहे. देशाच्या सर्वांगीण उत्कर्षाला ध्येय मानून एक आदर्शवादी ऊर्जा निर्माण करण्याचे काम फाऊंडेशन अंतर्गत केले जाते.


