संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी शहरातून जाणाऱ्या पांढरकवडा रस्त्यालगत वाघाडी नदीच्या जवळ असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डालगत राज्य मार्गावरील हिरवेगार राहणारे झाड आता सुकलेले आहे. हिरवेगार असताना या झाडावर पक्ष्यांची शाळा असायची. परंतु आता निष्पर्ण वृक्षावर एका दिवशी बगळ्यांची शाळा भरली असल्याचे छायाचित्र एका पक्षीप्रेमीने काढून सोशल
मीडियावर अपलोड करीत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विषद केले. याला मिळत प्रात्साहन बघत नगरपरिषदेच्या वतीने
त्या वृक्षाची रंगरंगोटी करून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला.
वृक्ष केवळ वृक्ष नसते ते ‘जैवविविधतेचा आसरा असते वृक्ष केवळ वृक्ष नसते ती एक ‘परिसंस्था’ असते. या म्हणी प्रमाणे शहरातील कापूस यार्ड घाटी येथील एक सुकलेले वृक्ष आहे. त्या वृक्षाने कित्येक वर्ष आपल्याला सावली दिली असेल परंतु आज तो महतारा झाला तरी पण तो
खंबीर पणे उभा आहे. आपल्या गावात परिसरात असेच आपल्या पूर्वजाने व शासनाने लावलेले विविध प्रकारचे डेरेदार वृक्ष आजही आपल्याला
घाटंजी नगरपरिषदेचा उपक्रम ऑक्सिजन व सावली देत आहे. पण ते वयानुसार शेवटच्या घटका मोजत असतील, याकरिता सर्वांनी नवीन वृक्ष लावावे तसेच असलेल्या वृक्षाचे संगोपन करुन येणाऱ्या नवीन पिढीला मायेची सावली व शुद्ध
हवा देता येईल. या विचाराने प्रेरीत होत प्रा. राहुल वानखडे यांनी सुकलेल्या वृक्षावरील बगळ्याचे छायाचित्र काढून ‘जैवविविधतेचा आसरा’ या मथळ्याखाली वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विषद करीत फेसबूक पोस्ट अपलोड केली. ही पोस्ट अनेकांना आवडली. त्यांच्याच संकल्पनेतून नगर परिषदचे मुख्याधिकारी व प्रशासनाने पृथ्वीवरील जीवनक्रमानुसार पक्षी, जंगली जनावर हे वृक्षांवर अवलंबून असतात म्हणून त्यांचीच जसे पोपट, हत्ती, सांभर आणि हरिण यांचे छायाचित्र या वृक्षावर काढून व रंगरंगोटी करुन वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, यावेळी न. प मुख्याधिकारी तथा प्रशासक राज् घोडके, प्रकाश घोती, विवेक ससाणे बांधकाम अभियंता, पाणी पुरवठा अभियंता ज्ञानेश्वर घरडे, विक्की शिंदे, प्रवीण हातमोडे, रोशन तायडे तसेच कंत्राटदार अमीत प्रधान, गोलू फुसे, मंदार बुक्कावार, अक्षय वातीले, मनीष बोरकर तसेच न. प कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.