मनोज बिरादार
ग्रामीण प्रतिनिधी नांदेड
देगलूर येथील पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष शेख असलम यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. या निमित्ताने देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फळ वाटप आणि कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देगलूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारोती मुंडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर साखरे, तर प्रमुख उपस्थितीत सहायक पोलिस निरीक्षक आश्रुदेव पवार, डॉ. सचिन गायकवाड, डाॅ. चंद्रकांत पाटील, डॉ. काझी विजारत अली, डॉ. मोना मॅडम, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्यउपाध्यक्ष विशाल पवार व जयपाल कांबळे सांगवीकर उपस्थित होते.यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळे, बिस्किट आणि पाणी बॉटलचे किट वाटप करण्यात आले. त्यानंतर कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी शेख असलम यांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करताना म्हणाले की, कोरोना काळात डॉक्टर आणि आरोग्यसेवकांनी देवदुताची भूमीका पार पाडली. आज अशा देवदुतांचा सन्मान व गरजू रुग्णांना मदत करणे हे खरोखरच प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता निर्माण होते.
डॉ. मुजिब यांनी आपल्या भाषणात कोरोना काळातील आठवणींना उजाळा दिला आणि ते पुढे म्हणाले की, शेख असलम यांच्या वाढदिवसानिमित्त डाॅक्टर, नर्स व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करुन आम्हाला कार्य करण्याची प्रेरणा दिली. त्याबद्दल त्यांनी पत्रकार संघटनेचे धन्यवाद व्यक्त केले. तसेच वैद्यकीय अधिक्षक डाॅ नरेश देवणीकर यांच्या नेतृत्वात पुढेही अशीच सेवा करण्याची ग्वाही दिली.
शेख असलम बोलताना म्हणाले की, “वाढदिवस हा केवळ उत्सव नसून समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची संधी आहे. पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड आणि सचिव शशिकांत गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनात व पत्रकार संरक्षण समितीच्या सहकाऱ्यांने हा सुंदर उपक्रम राबविण्यात आला. भविष्यातही असेच सामाजिक उपक्रम राबवू.” असे त्यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अमित पाटील, सचिव मिलिंद वाघमारे, कार्याध्यक्ष धनाजी देशमुख, कोषाध्यक्ष काझी तौहीत, संघटक गजानन टेकाळे, सहसचिव मनोज बिरादार, सदस्य उबेद हबीब नागेश पलपवार, रियाज अत्तार,
डॉ. सैलानी वन्नाळीकर, सचिन कुंभारे, शेख अफान, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव मिलिंद वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन कोषाध्यक्ष तौहीत काझी तर आभार प्रदर्शन विशाल पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संरक्षण समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले या अभिनव उपक्रमाचे देगलूर तालुक्यातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.