६ व ७ जानेवारीला रंगणार कबड्डी, खो-खो, लंगडीचे सामने
गणेश वाघ
ग्रामीण प्रतिनिधी कसारा
टच संस्था प्रस्तुत एकलव्य स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ग्रामीण क्रिडा महोत्सवाचे आयोजन ६ व ७ जानेवारी २०२४ रोजी टच बालग्राम विहीगाव या ठिकाणी करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शरीराने काटक असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्रिडा कौशल्याला वाव मिळावा यासाठी ग्रामीण क्रिडा महोत्सवाचे आयोजन केले असून या स्पर्धेची पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी व नववी ते दहावी अशा तीन गटात विभागणी करण्यात आली आहे. सांघिकमध्ये कबड्डी, खो-खो, लंगडी व वैयक्तिकमध्ये धावणे, लांबउडी, सुर्यनमस्कार असे खेळप्रकार खेळवले जाणार आहेत. तसेच या क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन पद्मश्री श्री. उदय देशपांडे यांच्या हस्ते होणार तरी या ग्रामीण क्रीडा महोत्सवाचे पारितोषिक वितरण ७ जानेवारीला स्पर्धेनंतर लगेच होईल. तरी या ग्रामीण क्रीडा महोत्सवात सर्व शाळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन टच बालग्रामचे प्रकल्प समन्वयक उमाकांत पांचाळ यांनी केले.

