मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदूर रेल्वे/देर आये दुरुस्त आये च्या धर्तीवर शहरातील मुख्य नाल्यांच्या सफाई मोहिमेला अखेर शुक्रवारपासून स्थानिक नगर परिषदेने च्या वतीने सुरुवात करण्यात आली, त्यासाठी भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तेजस वाट व प्रभाग क्रमांक 1 चे नागरिका नी गुरुवारी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना शहरातील नाला सफाई करण्याकरता निवेदन दिले होते, याची दखल घेत नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवारपासून शहरातील मुख्य न्यायालयाचे साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली असे वार्ड क्र एक मध्ये चर्चेचा विषय आहे शहरातील प्रमुख वस्त्यांमधून तीन मोठे नाले जातात, या नाल्यांमध्ये काटेरी झाड तण, घाण व कचऱ्याने तुडुंब भरलेले आहे,, या नाल्यांची स्वच्छता होत नसल्याने आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासोबतच आजारांमध्येही वाढ होत असून, नाल्यांमधील कचरा आणि काटेरी झुडपांमुळे हे नाले पावसाळ्यात बंद पडतात, त्यामुळे नाल्यांमधून वाहून जाणारे पावसाचे पाणी येथे राहणाऱ्या लोकांच्या घरात शिरते, नाल्यातील पाणी घरात शिजल्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक नुकसानाबरोबरच मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असून, यातून दिलासा मिळावा यासाठी गुरुवारी भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तेजस वाट व प्रभाग क्र १ मधील नागरिकांनी मुख्य नाल्यांची सफाई करण्याकरिता मुख्याधिकारी यांना गुरुवारी निवेदन दिले होते. या नाल्यांच्या स्वच्छतेबाबत यापूर्वीही विविध संघटनांनी पालिकेला निवेदने दिली आहे,


