शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू, मानस स्पोर्ट्स क्लब सेलू वतीने दि. ४ जुलै रोजी जिल्हा पुरुष कबड्डी संघाचे प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन नूतन विद्यालय शि.सं.क्रीडा इनडोअर हॉल मध्ये नूतन संस्था सचिव डॉ .व्हि.के.कोठेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. एस.एम. लोया, मुख्याध्यापक एस.व्ही. पाटील, सौ.एन.डी. पाटील,के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, अनिल रत्नपारखी, पुरुषोत्तम पावडे, तांत्रीक समिती प्रा.डाॅ. ज्ञानेश्वर गिरी, भारत धनले, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.परभणी जिल्हा पुरुष गट कबड्डी प्रशिक्षण शिबीर दि. 4 ते 13 जुलै दरम्यान नूतन क्रीडा इनडोअर हॉल मध्ये संपन्न होणार आहे. या सराव शिबीरात 20 खेळाडू असून अंतिम संघाची घोषणा 13 जुलै रोजी होऊन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन वतीने राज्यस्तरीय पुरूष गट कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन दि. 15 ते 17 जुलै दरम्यान पुणे येथे होणा-या या स्पर्धेत परभणी जिल्ह्याचा कबड्डी संघ सहभागी होणार आहे. शिबिरास मार्गदर्शन राष्ट्रीय प्रशिक्षक प्रा. ज्ञानेश्वर गिरी,प्रशांत नाईक यांचे लाभणार आहे . कार्यक्रमाचे सूत्र संचालन क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत नाईक तर आभार प्रदर्शन संजय भूमकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी तेसाठी किशोर ढोके, राजेश राठोड,अनुराग आमटी,गोपाल आम्ले, यांनी परिश्रम घेतले.