भागवत नांदणे सर्कल प्रतिनिधी वरवट बकाल
संग्रामपूर:संग्रामपूर तालुक्यात चोरट्यांनी चांगलाच हैदोस केला आहे. कोण्या व्यक्तीचे मोबाईल, कोणाची मोटारसायकल तर कोणाच्या शेतातील साहित्य वर डल्ला मारला आहे. तरी कानून के हाथ लंबे होते है ही म्हणं सोनाळा पोलिसांनी खरं करून दाखवली आहे. सविस्तर वृत्त अशे की, सोनाळा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दत्तात्रय धर्मराज टाकसाळ वय २७ रा. लाडणापूर यांनी २५ जुन रोजी त्यांच्या राहत्या घरातून एक विवो कंपनीचा Y31 मॉडेल जुना वापरता मोबाईल किंमत १० हजार, एक जुनी वापरती मोशन कंपनीची वेल्डिंग मशीन किं. अं. ६ हजार २०० रु, एक जुने वापरते हिताची कंपनीचे ॲल्यूमिनियम कटर किं. अं. ५ हजार असा एकूण २१ हजार २०० रुपयाचे साहित्य कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तोंडी रिपोर्ट नुसार अप.नं. १७३/२०२४ कलम ३८०, ४५७ भादंवी नुसार गुन्हा दाखल करून तपास घेण्यात आला. तपास दरम्यान सोनाळा पोलिसांनी या घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. या चोरट्यांकडून वरील नमूद साहित्य व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल किं. अं. ४० हजार रुपये असा एकूण ६१ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेख इरफान शेख युसूफ वय २९ रा. राह. झोपडपट्टी सोनाळा, शेख युसूफ शेख अहेमद वय ३६ रा. इमलीपुरा सोनाळा अशे आरोपीची नावे आहेत. यांना न्यायालयात हजर केले असता २ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या आरोपींताकडून परिसरातील आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विशाल गवई, पोकॉ. कैलास सांगळे, पोकॉ संदीप सुसर करीत आहेत.


