संजय शिंदे ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर शहरातील हर्षवर्धन पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये राज्य शासनाच्या ” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने ” चा लाभ महिलांना व्हावा याकरिता शनिवार (दि. 6) पासून दररोज सकाळी 10 ते 12 व सायंकाळी 4 ते 6 या वेळेत अर्ज नोंदणीसाठी मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. तरी पात्र महिला भगिनींनी या मदत कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी केले आहे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन (भाऊ) पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महिला भगिनींसाठी सदर मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. या योजनेत वय वर्ष 21 ते 65 वयोगटातील महिला, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखाच्या आत आहे, अशा महिला पात्र ठरणार आहेत, असे त्यांनी सांगितले. या योजनेमध्ये सहभागासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुक, फोटो, आदी कागदपत्रे आवश्यक असणार आहेत. तरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर न्यायालयानजीकच्या संपर्क कार्यालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या मदत कक्षाचा महिला भगिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन अंकिता पाटील ठाकरे यांनी केले आहे.