शरद भेंडे तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोलखेड शिवारात अनंता पंढरी ताडे यांच्या गावाला लागत असलेल्या शेतातील गट नंबर 378 मध्ये अज्ञात रानटी प्राण्याने दोन बकऱ्या व दोन पिल्लासह एका म्हशीच्या पिल्लावर प्राणघातक हल्ला करून त्यामध्ये त्यांचा जीव गेला.ही घटना दि.5/7/2024 रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान घडली.यामध्ये पाळीव प्राण्यांच्या मालकांचे अर्थात पशुपालकांचे सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले मात्र वनविभागाला ही बाब माहित झाल्यावर वनविभागाने गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा केला व अन्यायग्रस्त पशुपालकांना नुकसान भरपाई मिल्ने करिता अहवाल दाखल केला आहे.तरी वन्य प्राण्यांचा होत असलेला गावाकडील वावर याचा वनविभागाने कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी घाबरलेल्या पशुपालकांनी मागणी केली आहे.