कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद
पावसाळा सुरू झाल्याने व आता शाळा,महाविद्यालय सुद्धा सुरू होणार असून यात रस्ते चांगले असणे आवश्यक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया चौक ते उमरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर खूप मोठ मोठे खड्डे पडलेले असून त्यात खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे.तो उमरखेड व नांदेडकडे जाणारा रस्ता असून आता शाळा,महाविद्यालय सुरू होणार असून विद्यार्थ्याना सुद्धा येता जाता त्रास होणार आहे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.त्यामळे पुढील अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण त्या रस्त्याची पाहणी करून रस्त्यावरचे खड्डे दुरुस्ती करून रस्ता चांगला करावा अन्यथा कुठलीही जीवित हानी झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार असेल.अश्या आशयाचे निवेदन आज मुख्याधिकारी साहेब पुसद यांना देण्यात आले.लवकरात लवकर काम सुरु न झाल्यास स्टेट बँक चौकामध्ये भीम आर्मी च्यां वतीने दिनांक १.७ २०२४ चक्काजाम आंदोलन करण्यात येईल.पुढील उद्भवलेल्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार असेल.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)