रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर ग्रामपंचायत सरपंच रुपेश वल्लभदासजी राठी यांची राष्ट्रीय सरपंच संघ च्या राष्ट्रीय महासंघटक पदी निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय सरपंच संघ अधिवेशन नुकताच संपन्न झाले. या अधिवेशनातराष्ट्रीय अध्यक्ष महासचिव यांच्या सर्वानुमते त्यांची राष्ट्रीय सरपंच संघच्या राष्ट्रीय महासंघटक पदी सरपंच रुपेश राठी नियुक्ति करण्यात आली.राष्ट्रीय सरपंच संघ या संघटनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागामधे जास्तीत जास्त विकास कसा होणार आणि या संघटनेमुळे सर्व देशभरात पंचायत राज बळकट कशी होणार सरपंचांच्या अधिकारां मध्ये वाढ करून गावचा विकास चांगल्या प्रकारे कसा होणार हि चर्चा करण्यात आली.सरपंच रुपेश राठी यांनी आपल्या नियुक्ती श्रेय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री पुरषोत्तम पाटील घोगरे व ग्रामपंचायत पदाधिकारी व सहकारी गावकरी मंडळी यांना दिले असून त्यांच्या नियुक्तीचे अकोला जिल्ह्या मधून सर्व स्तरातून सरपंच रुपेश राठी यांचे अभिनंदन होत आहे.


