विजयकुमार गायकवाड तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर: कुंभारगाव(ता.इंदापुर) येथील लक्ष्मी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन काशिनाथ धुमाळ यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावरती ज्ञानदेव बंडगर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक प्रक्रिया इंदापूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात पार पडली निवडणूक अधिकारी म्हणून मिलिंद राऊत यांनी कामकाज पाहिले ज्ञानदेव बंडगर यांचा एकमेव अर्ज आला होता संतोष धुमाळ यांनी सूचना मांडली त्याला प्रमोद धुमाळ यांनी अनुमोदन दिले १३ सदस्या पैकी १ जागा रिक्त आहे तर उर्वरित १२ सदस्या पैकी ७ सदस्य उपस्थित होते तर ५ सदस्य गैरहजर होते. यावेळी संचालक काशिनाथ धुमाळ संतोष धुमाळ प्रमोद धुमाळ राजेश शिंदे बुद्धिवान गोरे महिला संचालिका कावेरी धुमाळ उपस्थित होते कुंडलिक धुमाळ यांनी नवनिर्वाचित चेअरमन ज्ञानदेव धुमाळ यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नामदेव पवार पांडुरंग बंडगर अनिल गोरे संस्थेचे सचिव महादेव पवार सहसचिव रवींद्र धुमाळ उपस्थित होते नामदेव पवार यांनी सर्वांचे आभार मानले.


