शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानतीर्थ विद्यालयातील नऊ विध्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहे. याबद्दल या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम (ता.21) रोजी विद्यालयात पार पडला. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इ. 5 वी मध्ये आरोही बेळकोणे, स्वरा वाघमारे, सृष्टी तायवाडे, राम वायाळ, तनुश्री डख, साधना कंठाळे तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी चे सई सोनटक्के, रश्मी झोडगे, कृष्णा रासवे आदी विद्यार्थी पात्र झाले या यशाबद्दल शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी कौतुक केले. यावेळी डॉ. सविता रोडगे, शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके, व सर्व शिक्षकानी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.


