सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी
लोकसभा निवडणूकीच्या काळात जिल्हा पोलीसांनी विविध कारवाईत ३ कोटीपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त केला असून एकुण ४०९५ इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत २४ हद्दपार प्रस्ताव, ३२ पाहिजे फरार आरोपी अटक करण्यात यश मिळवले आहे. लोकसभा निवडणूकीचे काळात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने आजपावेतो एकुण ३ कोटी ०८ लाखांहून अधिकचा मुद्देमाल विविध कारवाईत जप्त केला आहे. त्यात ९४ लाख ११ हजार ८५५ रूपयांची अवैध दारू, ३ लाख ५७ हजार ७१८ रुपये किमतींचा गांजा, तसेच प्रतिबंधीत असलेला एकुण ७० लाख ३० हजार ९०३ रूपये किमतींचा गुटखा,व त्यासाठी वापरण्यात येणारी वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील आजपोवतो एकुण ४०९५ इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे तसेच विविध गंभीर गुन्ह्यातील एकूण २४ सराईत गुन्हेगारांवर हद्दपार प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील विविध गुन्ह्यातील ३२ फरार आरोपी असलेल्या एकुण ३२ आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे. तसेच आजपावेतो जिल्ह्यातील ४८४ शस्त्र परवाना धारकांकडुन शस्त्रे जमा करण्यात आले आहे. संपुर्ण जिल्ह्यात २६ आंतरराज्य आणि ८ आंतरजिल्हा तपासणी नाके /नाकाबंदी पाइंट कार्यरत असुन या नाक्यांवरुन अवैध दारू अंमली पदार्थ बाबींची वाहतूक होणार नाही यासाठी तपासणी सुरू आहे. लोकसभा निवडणूक काळात कुठल्याही आमिश व भिंतीला बळी न पडता,आपले मतदान करावे आपले लोकशाही कर्तव्य बजावावे नागरीकांना काही अडचण आल्यास किंवा काही असामाजिक तत्वांबदल व अवैध गतिविधींबदल माहिती असल्यास कुपाया पोलीस विभागास संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांनी केले आहे.