शिवाजी पवळ शहर प्रतिनिधी श्रीगोंदा
दिवसेंदिवस चिमण्यांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे.मानव जातीवर चिमण्यांचे खूप मोठे उपकार आहेत.ते आपणाकडून फेडणे शक्य नाही पण बदलत्या जीवनशैलीनुसार आज त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे . त्यातून त्यांची मुक्तता करण्यासाठी थोडा हातभार आपण लावू याकरिता खाण्याची व पाण्याची सोय करावी. अनेक पशुपक्ष्यांची खाण्याची सोय सर्वांनीच आपल्या पद्धतीने करावी.यामुळे पशुपक्ष्यांच्या संख्येमध्ये वाढ होईल व चिमण्यांच्या किलबिलाट वाढेल चिमण्यांची घटती संख्या लक्षात घेता जगातील देशांनी चिमण्यांना वाचवण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात येतो. .याकरिता 20 मार्च या दिवशी ठरविण्यात येते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने पहिला जागतिक चिमणी दिवस 20 मार्च 2010 ला साजरा करण्यात आला. जगात सर्वात जास्त संख्येने सापडणारा व माणसाच्या भोवती वावरणारा, नेहमी डोळ्यांना दिसणारा पक्षी म्हणून भारतभर चिमणीची ओळख आहे .आज बदलत्या तापमानामुळे व हवामानामुळे तसेच वाढते औद्योगीकरण ,व शहरीकरण, मोबाईलची टावर ,शेतातील रासायनिक खतांचा अतिवापर ,जंगलतोड, ध्वनि प्रदूषण यामुळे अनेक पशुपक्ष्यांचे जगणे कठीण झाले असून धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक पशुपक्ष्यांची जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. जंगल तोडीमुळे जंगलातील पशुपक्षी शहराकडे धाव घेताना दिसतात. मानव जातीच्या अतिक्रमामुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे.पूर्वीच्या काळी मातीची व कौलाची घरे असल्यामुळे त्यांना घरटी करणे सोपे जात असे व चिमण्यांचा मधुर किलबिलाट ऐकू यायचा. यावरून सकाळचा काय वेळ झाला आणि संध्याकाळचा काय वेळ झाला हे किलबिलाट होऊन ताबडतोब सर्वांच्या लक्षात येत असे परंतु आज हे किलबिलाट नामशेष झाले आहे.चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी योग्य जागा मिळत नाही् पाण्यासाठी त्यांना वन वन फिरावे लागत आहे अशी भयंकर परिस्थिती चिमण्यांच्या झाली आहे.चीन देशाने 1958 ते 1962 या चार वर्षाच्या कालावधीमध्ये कीटक मोहीम राबवली त्यात पिकाचा नाश करणाऱ्या घटकांचा म्हणजे उंदीर, डास,मश्या आणि चिमण्या हे चार जीव नष्ट करण्याचे ठरवल्यामुळे चिन मध्ये चिमण्यांची संख्या कमी झाली यामुळे याचा गंभीर परिणाम चिनच्या पर्यावरणावर झाला. यानंतर पक्षीतज्ञांनी सांगितले की चिमणी पर्यावरणाच्या दृष्टीने जगणे अवश्यक आहे.जगभरात चिमण्यांच्या अनेक जाती पाहायला मिळतात . गेल्या 25 वर्ष्यात आत्तापर्यंत पक्षांच्या संख्येमध्ये सर्वात मोठी घट झालेलीदिसून येत आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे .चिमण्या कमी झाल्या तर माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहे.असे मार्गदर्शन वात्सल्य संस्थेचे उर्मिलाताई पवळ यांनी केले व तसेच सर्व उपस्थित महिलावर्ग व विद्यार्थ्यांना चिमण्यांसाठी कुंड्या वाटण्यात आल्या .वात्सल्य संस्था गेली तेरा वर्षां पासून पशुपक्षांवर कार्य करते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी रोहि यांनी केले.