नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर. तालुक्यातील कोतलवाडी येथील शेतकरी दशरथ पाप्पया गायकवाड वय वर्षे ४० हे दिनांक २२रोजि सकाळी ८ वाजता कोतलवाडी येथे महाकाली च्या मंदिरासमोर शेतातून घरी येताच आरोपी बालाजी सायबु गायकवाड कोतलवाडी यांने फिर्यादीस आमच्या भावाभावाचे भाडन का सोडवले नाही म्हणून फिर्यादीचे जिवे मारण्याच्या उद्देशाने डोळ्यांच्या वर कुराडीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले असल्याने जखमी वर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक माहिती अशी कीफिर्यादी दशरथ पाप्पया गायकवाड हे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात विष्णुपुरी नांदेड येथे उपचार घेत आहे या घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस स्थानकात आरोपी बालाजी सायबु गायकवाड राहणार कोतलवाडी यांच्याविरुद्ध ३०७ भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक नीता कदम यांच्याकडे सोपवला त्या कामी बिट जेमदार एस एल कदम हे काम करीत आहेत.

