बापू मुळीक तालुका प्रतिनिधी पुरंदर
पुरंदर तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने टंचाई स्थिती निर्माण झाली आहे. सध्या तालुक्यातील अनेक गावे व वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यातील ३४ गावांना ५० टँकरने पाणीपुरवठा होत आहे अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पुरंदर सचिन घुबे यांनी दिली.पुरंदर तालुका सध्या भीषण दुष्काळाला सामोरा जात आहे. तालुक्यात जनावरांचा चारा- पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी शासनाने तीव्र दुष्काळ जाहीर केला, परंतु, अद्याप कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे अनेक गावांत पाणी हे शुध्द असावे.तीव्र पाणीटंचाईमुळे पाणीटंचाईला महिला त्रस्त पशुधन जगवणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. घोरवडी धरणातून दिवे प्रादेशिक योजना आहे. परंतु, पाइप फुटीमुळे ही योजना बंद आहे. त्यामुळे या योजनेवर असलेल्या दिवे व वाड्यावस्त्या, उदाचीवाडी यासह अनेक गावांना सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. टंचाईग्रस्त ३४ गावांत २३ मार्च पासून शासकीय ९ व खासगी ४१ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केल्याचे घुबे यांनी सांगितले. याबाबत खानवडीचे उपसरपंच स्वप्नील होले म्हणाले, की खानवडी गावाला मागणीपेक्षा कमी पाणी मिळत आहे. रोज टँकरच्या दोन खेपा होत आहेत.


