बापू मुळीक तालुका प्रतिनिधी पुरंदर
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली होती. त्यात वैकुंठवासी वेदांत चार्य 108 स्वामी मोहना नंदगिरी जी महाराज यांचे आशीर्वादाने व हरिभक्त परायण राजाराम महाराज कामठे व हरिभक्त परायण बाबासो श्रीपती कुंभारकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले गेली 48 वर्ष झाली कुंभार वळण येथे अखंड हरिनाम सप्त्याचे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड चालू आहे. 17 /3/ 2024 पासून ते आजतागायत कीर्तनकार, हरी जागर, सकाळचा नाश्ता, दुपारची पंगत, संपूर्ण गावाला आणि पाहुणे मंडळी व वारकऱ्यांना महाप्रसाद. तर 23/03/2024 रोजी ज्ञानेश्वरी मंगल नंतर दिंडी नगर प्रदक्षिणा व कावडीची मिरवणूक झाली. रविवार सकाळी नाश्ता, दत्तात्रय कुंभारकर बागायतदार यांच्यातर्फे झाले .हरिभक्त परायण आकाश महाराज कामठे यांचे काल्याचे किर्तन झाले. हरिभक्त परायण राजाराम महाराज कामठे यांच्या 90 व्या अभिष्टचिंतन व हरिभक्त परायण सुशीला राजाराम कामठे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त 91 सार्थ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट संजय जगताप आमदार पुरंदर- हवेली व नाना महाराज खळदकर तेल्या भुत्याची प्रथम मानाची कावडीचे वंशज यांच्या हस्ते करण्यात आले. चंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त कालयाचा महाप्रसाद ज्ञानेश्वर कामठे, नामदेव कामठे ,धनराज तापकीर ,रोहन तापकीर, मिलिंद झेंडे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी संजय जगताप आमदार पुरंदर -हवेली ,नाना महाराज खळदकर तेल्या भुत्याची प्रथम मानाच्या कावडीचे वंशज नंदू काका जगताप, देविदास कामठे,अभिजीत जगताप, के.डी. मोरे, सरपंच मंजुषा गायकवाड, उपसरपंच संदीप कामठे,माजी उपसरपंच नंदू बापू कामठे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य अमोल कामठे, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, शिपाई , तंटामुक्ती अध्यक्ष नाना कामठे,उपाध्यक्ष रमेश कामठे,प्रकाश कामठे ,नंदू नेटके, शिवाजी कामठे, सागर तात्या काळे, रामदास काळे, विठ्ठल गुरव ,सासवड नगरपालिकेचे कर्मचारी ,पत्रकार बांधव, सर्व वारकरी बंधू-भगिनींना कपडे वाटप, स्पीकर व्यवस्था, चहापान व्यवस्था ,संपूर्ण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, संपूर्ण देवाचा पोशाख ,पाणी टँकर व्यवस्था, संपूर्ण आहाराची व्यवस्था ,गायनाचार्य ,मृदुगरमनी ,हार्मोनियम, नारळाचे पोते, पहारेकरी, चोपदार, वॉशिंग वाले ,मंदिरात आकर्षक सजावट, सप्ताह मध्ये कीर्तनाचे व्हिडिओ शूटिंग व youtube वर दर्शवणे ,यात प्रामुख्याने व्यवस्थापक विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ ,ग्रामस्थ मंडळ ,शिव शंभो तरुण मित्र मंडळ कुंभार वळण,महिला मंडळ मोठ्याप्रमाणात हजर होते. फोटो :- हरिभक्त पारायण राजाराम महाराज कामठे यांच्या 90 व्या अभिष्टचिंतन व हरि भक्त पारायण सौ. सुशीला राजाराम यांच्या सहसत्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त 91 सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देताना मान्यवर.