शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सामाजिक कार्यातून रमेश राजेभाऊ खराडे पाटील (भाऊजी) यांची निवड.सेलू : सेलू तालुक्या तील देवगाव फाटा येथिल रमेश राजेभाऊ खराडे पाटील (भाऊजी) यांची निवड राष्ट्रीय पातळीवरील ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन निर्मित साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ याकरीता करण्यात आली असून हा भव्य व दिव्य साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ सोहळा शिर्डी येथे लखलखीत व रंगबेरंगी विद्युत रोषणाईत पार पडणार असुन तरी पुरस्कारार्थींन सोबत पुरस्कार सोहळ्याचे साक्षीदार व्हावेत म्हणून पती, पत्नी, मित्र आमंत्रित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यास वेळेवर उपस्थित राहावे शिर्डी येथे ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य येथे हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडणार आहे. केलेल्या उत्कृष्ट पत्रकारिता व समाजिक कार्यातून ही निवड झाली असून पत्रकार रमेश खराडे पाटील यांचे सर्व मित्र परिवाराकडून तालुक्यातून सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव व कौतुक होत आहे.

