(नवरदेवासह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल)गजानन डाबेरावग्रामीण प्रतिनिधी नांदुरानांदुरा:- वाडी तालुका नांदुरा येथील घटना असून सविस्तर असे की लग्न ठरलं साखरपुडा झाला लग्नाच्या निमंत्रण पत्रिका नातेवाईकांना पाठवण्यात आल्या लग्न घटिका जवळ येत असताना अचानक नवरदेवाने नवरीला फोन करून तुझ्या वडिलांकडून तीन लाख रुपये हुंडा पाहिजे. हुंड्याची मागणी केल्याने नवरीच्या पित्याला अचानक धक्का बसला लग्नाच्या तोंडावर अचानक तीन लाख रुपये मागणी केल्याने नवरीच्या पित्याने नांदुरा पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दाखल करून नांदुरा पोलिसांनी नवरदेवासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना नांदुरा तालुक्यातील वाडी येथे उघडकीस आली. चिखली येथील रहिवासी नेहल किसनराव शेळके यांचा विवाह नांदुरा तालुक्यातील वाडी येथील मुलीचे वडील महादेव उखर्डा चीमकर वय ५४ वर्ष यांच्या मुली सोबत धुमधडाक्यात साखरपुडा करून सर्व नातेवाईकांच्या साक्षीने विवाह ठरला होता नवरीच्या वडिलांनी साखरपुड्याच्या दिवशी ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी नवरदेवाला देण्यात आली . लग्नाची तारीख ठरविण्यात आली नवरीच्या वडिलांनी सर्व सामान खरेदी करून लग्नाची जोरदार तयारी केली. महागडा बँड सांगितला मंडपाची घोड्याची बुकिंग सुद्धा करण्यात आलेली आहे. लग्नाच्या पत्रिका छापून सर्व नातेवाईकांना वाटून देण्यात आल्या. लग्नाची सर्व तयारी झाली असताना अचानक नवरदेवाने नवरी मुलीला फोन करून तुझ्या बापाने मला तीन लाख रुपये नाही दिले तर मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही असे फोनवरून सांगितले हे ऐकून मुलगी आश्चर्यचकित झाली. हा सर्व प्रकार मुलीने आपल्या वडिलांना सांगितला मुलीच्या वडिलांनी विवाह मध्ये मध्यस्थी असलेल्या सर्व नातेवाईकांना हा प्रकार सांगितला असता नवरदेवाकडील मंडळी हा प्रकार ऐकून घ्यायला तयारच नाही अखेर याबाबत महादेव उखर्डा चीमकर यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी नवरा मुलगा नेहल किसनराव शेळके गोकर्णबाई किसन शेळके प्रकाश किसन शेळके अमोल किसन शेळके कुशल किसन शेळके यांच्याविरुद्ध कलम ३,४ हुंडाबळी प्रतिबंधक अधिनियम १९६१ सह कलम ५००,३४ भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास ढाकणे मॅडम करीत आहे
.