भागवत नांदणे
सर्कल प्रतिनिधी वरवट बकाल
जळगांव जामोद: हॅलो मी सीबीआय मधून बोलतोय तुमचा मुलगा मोठ्या रॅकेटमध्ये फसला असून तात्काळ पैसे दिल्यास तो वाचेल अन्यथा १५ वर्षा साठी जेलमध्ये जाईल. अशा फेककॉल ने सध्या जामोद वासीयांची डोकेदुखी वाढली आहे. शहरातील दोन ते तीन जनांना आज्ञातांनी फेक कॉल करून अशा पद्धतीने धमकाविल्याच्या घटना घडल्याने पोलिसांनी अशा आरोपीचा शोध घेऊन, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. इंटरनेटने जसे जसे जग जवळ येत चालले तसा तसा डोक्याचा तापही वाढत चालला आहे. काही हुशार आपल्या ज्ञानाचा वापर गैर कृत्यासाठी करत असल्याचे दिग्दर्शनात येत आहे. लोकांची फसवणूक करणे, त्यांना लुबाडणे असे धंदे सध्या जोरात सुरू आहेत सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती शेअर करत नको आनंद व्यक्त करत असताना काही महाभाग ती माहिती संकलित करून त्यांचा गैरवापर करून लोकांना लुबाडत आहे. असाच एक प्रकार दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे जनतेने अनोळखी कॉल रिसीव करू नये किंवा असे कॉल आल्यास त्याला प्रत्युत्तर देऊ नये आणि फसवणूक होत असल्याचे जाणवल्यास तात्काळ सायबर सेलकडे तत्काळ करावी.
आनंद महाजन, पोलीस निरीक्षक, जळगाव जामोद


