संदीप सोनोने अकोला तालुका प्रतिनिधी अकोला
पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत बोरगाव मंजू येथील २०१९/२० या वर्षात १४ वित्त आयोगाच्या अंदाजे नव्वद लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती,या निधीतून गावातील विविध विकासकामे करण्यात आली होती, परंतु या १४ वित्त आयोगाच्या निधी अंदाज पत्रकानुसार खर्चित न करता या निधीचा अपहार झाला, अशी तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते रामराव ढवळे, अशोक तायडे देवानंद मोहोड सुबोध गवई दिनेश मोरे संजय अजमेरा मोहम्मद हकीम सुमित्रा पोफळे यांनी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी,, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या कडे लेखी तक्रार करून योग्य चौकशी करून न्याय मिळावा यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविले अखेर या अफरातफर प्रकरणी संबंधित विभागाने चौकशी केली असता,१४ वित्त आयोगाच्या कामातून ३२,६६ ,000 ( बत्तीस लाख साशष्ट हजार रुपयांचा निधीचा अफरातफर भ्रष्टाचार उघडकीस आला आहे,या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत अखेर तात्कालीन ग्रामसेविका अमिता दिपक इंगळे व माजी सरपंच चंदाताई दिलीप खांडेकर यांच्या कडून वसुली करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अकोला यांनी आदेश दिले आहेत,तर तात्कालीन ग्रामसेविका अमिता इंगळे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे,१४ व्या वित्त आयोगाच्या कामातून बोरगाव मंजू येथील विकास कामे सिमेंट रस्ते , नाली बांधकाम, आदी विकास कामात भष्टाचार केला अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते रामराव ढवळे व अशोक तायडे यांनी लेखी तक्रार केली होती, या तक्रारीची चौकशी संबंधित विभागाने केली असता,मजुरांचे हजेरी पत्रकावर मजुरीचे दिवसाची हजेरी न घेता फक्त मजुरांचे नाव लिहून कोरे हजेरी पटावरील मजुरी एकाच मजुराचे नावाने दाखवून ११,२८,००० चा भष्टाचार केल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाले,एकच मजुर एकाचवेळी एकाच दिवशी दोन कामावर दाखवून भ्रष्टाचार केल्याचे निष्पन्न झाले,सिमेंट रस्ते, नाली बांधकाम व इतर बांधकामावर लागणारे साहित्याचे खोटे (बनावटी )व कोरे बिले अन्वी येथील विदर्भ हार्डवेअर चे दुकान नसताना त्याचे बिल यकबाल देशमुख यांचे नावे २१,३८,०००/ रुपये चे बिले काढून निधीचा भष्टाचार केल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले,एल.इडी .लाईट आठ ते नऊ लाखांचे खरेदी करावयाचे असताना ई – निविदा न मागविता नियमबाह्य खरेदी करण्यात आली, वरील मुद्दे अनुषंगाने ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत सन २०१९-२० या वित्तीय वर्षातील कामे सन निर्णयानुसार न करता शासकीय रक्कम एकुण निधी मंजूर पैकी ३२ लक्ष ६६ हजार, रुपयांचा भष्टाचार केल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाले, दरम्यान शासकीय निधी अफरातफर भ्रष्टाचार सिद्ध झाला,हा निधी तात्कालीन ग्रामसेविका अमिता इंगळे व माजी सरपंच चंदाताई खांडेकर यांच्या कडून वसुली करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अकोला यांनी दिले आहेत तर ग्रामसेविका अमिता इंगळे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत,संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारदार करीत आहेत पुढील कारवाईकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले असून भस्टाचारी मास्टर माईडला चागलीच चापरक बसली असून अजून दुसरे सरपंच व ग्रामसेवक याचे या करवाहिने धाबे दणाणले आहे.