परवेज खान तालुका प्रतिनिधी केळापूर
पांढरकवडा: जागतिक महिला दीना निमित्त श्री.बा.दे.पा.महाविद्यालय, पांढरकवडा आणि नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने नारी शक्ती फिटनेस रन (सामूहिक दौड ५०० मिटर ) चे आयोजन विद्यार्थिनींची धावण्याची क्षमता वाढविण्या साठी महाविद्यालयाच्या एन. एस. एस., क्रीडा विभाग व सांसकृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले. तसेच १५ आणि १६ मार्च २०२४ रोजी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नारी शक्ती फिटनेस रन (सामूहिक दौड ५०० मिटर ) ची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. के. सोरे व नेहरू युवा केंद्र यवतमाळ चे स्वयंसेवक सलमान रफिक खान यांनी हिरवी झेंडी दाखऊन केली. या दौड मध्ये पल्लवी दादाराव सिडाम हिने प्रथम क्रमांक पटकविला तर प्रणाली राजू जेंगटे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आणि किरण विजय धाबेकर हिचा तिसरा क्रमक आला. कबड्डी स्पर्धेत राधेश्याम नेतृत्व करत असलेली टीम ने बाजी मारली तर व्हॉलीबॉल स्पर्धेत विकास नगराळे ची टीम विजय ठरली. प्राचार्य डॉ. एन. के. सोरे व नेहरू युवा केंद्र यवतमाळ चे स्वयंसेवक सलमान रफिक खान यांनी प्रमाणपत्र व पारितोषिक त्यांचा गौरव केला. कार्यक्रमात महाविद्यालयाचे सांसकृतिक विभाग प्रमुख प्रा. एस. एस. सत्तूरवार , एन.एस.एस. विभागप्रमुख डॉ. प्रवीण कणके, क्रीडा विभाग प्रमुख, डॉ. पी. जी. जोशी तसेच महाविद्या लयातील समस्त प्राध्यापक मंडळी तसेच विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विध्यार्थी तसेच श्रीकांत मेश्राम, सतीश आरेवार , क्षीरसागर आणि गजू कर्णेवार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम ,नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांचे मार्गदर्शन मिळाले.

