गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा :-नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक २५. मार्च.२०२४ रोजी सकाळी साडेदहा वाजता ग्राम वडनेर भोलजी या ठिकाणी आज रोजी असलेल्या रंगपंचमी सणानिमित्त व आगामी तिथीनुसार साजरा केला जाणाऱ्या शिवजयंती निमित्त ग्राम वडनेर गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने पोलीस निरीक्षक विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे नेतृत्वामध्ये रूट मार्च काढण्यात आला होता रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशन नांदुरा व दंगा काबू पथक मलकापूर यांनी सहभाग घेतला होता.