वसीम शेख शहर प्रतिनिधि मेहकर
चिखली मेहकर रस्त्यावरील माळखेड फाट्यावर भीषण अपघात झाला आहे. सिलेंडर ची वाहतूक करणाऱ्या ट्रकने क्रेटा कारला धडक दिली. या अपघातत मेहकर येथील प्रतीथयश वकील अॅड. विजय हिम्मतराव बाजड (४०, रा. मेहकर) यांचे अपघाती निधन झाले आहे. आज, १३ मार्चला साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला.अॅड. विजय हिम्मतराव बाजड जिल्हा सत्र न्यायालयात व उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करीत होते. जिल्ह्यातील नामवंत वकील म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे दुसरे बंधू न्यायाधीश आहेत. अतिशय कष्टातून शिक्षण घेत श्री बाजड यांनी नावलौकिक मिळविला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रतांच्या धर्मजागरण विभागाचेही काम श्री. बाजड यांनी यापूर्वी सांभाळले होते. १० दिवसांपूर्वीच त्यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश लीगल सेलच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली होती. श्री बाजड यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय, वकिली क्षेत्रातून संवेदना व्यक्त होत आहेत.