स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : शिरूर तालुक्यातील सर्वच परीसरात मोठया प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. विकास कामे सर्वांना सोबत घेऊन आमदार अशोकबापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली जाणार आहेत. विकास कामांच्या बाबतीत कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळाच्या जोरावर आमदार अशोक पवार हे विकास कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांना साथ द्यावी. असे आवाहन शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तुषारभाऊ दसगुडे यांनी केले आहे. शिरूर तालुक्यातील रामलिंग येथील दसगुडे मळा येथे विविध विकासकामांसाठी आमदार अशोक बापू पवार यांनी सुमारे 53 लाख रुपयांचा निधी दिला आहे, आज आमदार अशोकबापू पवार यांच्या उपस्थितीत या कामांचा शुभारंभ पार पडला. येथील उदघाटन सोहळा प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार अशोकबापू पवार म्हणाले की संघटना मजबूत करण्यासाठी तालुक्यातील तसेच परिसरातील तरुणांनी संघटनेत सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे . आजचा तरुण हा उज्वल भारताचा भविष्यकाळ आहे. या परिसरात आतापर्यंत जवळपास सर्वच कामे मार्गी लागली आहेत. उर्वरित राहिलेली विकास कामे मार्गी लागण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या वेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तुषार दसगुडे,रामलिंग देवस्थान ट्रस्टचे खजिनदार पोपटराव दसगुडे,मा.आदर्श सरपंच नामदेवराव जाधव,सरपंच शिल्पा गायकवाड,उपसरपंच बाबाजी वर्पे,मा.उपसरपंच नितीन बोह्राडे,संजय शिंदे,सागर घावटे,भिमराज कर्हे,राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष संतोष बोह्राडे,सरचिटणीस सतिश कर्हे,ग्रामपंचायत सदस्य नंदा दसगुडे,स्वाती घावटे,लता इसवे,नामदेव दौंडकर,शिवाजी दसगुडे,शरद पवार,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शिरूर शहर महिला अध्यक्ष डाॅ. स्मिता कवाद,युवती अध्यक्ष गिताराणी आढाव,हाफीज बागवान,राहील शेख,रविंद्र खांडरे,शिरीष लोळगे,अक्षय सोनवणे,हरिभाऊ दसगुडे,सुभाष कर्डिले,सोमनाथ दसगुडे,अनिकेत दसगुडे,सुरज दसगुडे,विशाल दसगुडे,भिकाजी लोंढे, विलास कर्डिले,विजय दसगुडे,दामोदर दसगुडे,रंगनाथ दसगुडे,विठ्ठल देव्हाडे,भरत दसगुडे,शिवाजी लोंढे,संदीप कर्डिले,राजेंद्र कर्डिले, बाळासाहेब दसगुडे व शिरूर पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.