बद्रीमारायण गलंडे
जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली : विकसित भारत संकल्प यात्रा कनेरगाव नाका ग्रामपंचायत समोर आली असता गावातील प्रतिष्ठित नागरिकांना तसेच लाभार्थ्याना ग्रामपंचायनीने वेळेवर या उपक्रमाची माहिती दिल्याने बरेच ग्रामस्य या यात्रेपासून वंचित राहिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. विकसित भारत संकल्प यात्रा ही विशेष मोहीम २४ नोव्हेंबर ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत हिंगोली जिल्हात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंधाने ९ जानेवारी रोजी जिल्हातील कनेरगाव नाका ग्रामपंचायतीमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार होती. या विकसिस भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन योजना , आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना , ओडीएफ प्लस मॉडेल ग्रामपंचायत स्वच्छ भारत मिशन, कृषी विभागाच्या योजना, माय भारत धरती कहे पुकार के मेरी कहानी मेरी जुबानी आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करणे यासाठी संबंधित गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. , परंतु कनेरगाव नाका येथे ९ जानेवारी रोजी हि विकसित भारत संकल्प यात्रा कनेरगाव नाका ग्रामपंचायत समोर आली असता गावातील प्रतिष्ठित नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीने वेळेवर या उपक्रमाची माहिती दिली. त्यामुळे सर्व ग्रामस्यांनी कनेरगाव नाका ग्रामपंचायतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान त्यांना अशी काही कल्पना नसल्यामुळे कनेरगाव नाका येथे ग्रामपंचायतने लक्ष न दिल्यामुळे कनेरगाव नाका येथून विकसित भारत संकल्प यात्रा आल्या पावली तशीच परत गेल्यामुळे विकसित भारत यात्रा संकल्पनेचा कनेरगाव नाका येये बट्याबोळ झाला. व ग्रामपंचातीने लाभार्थ्यांना विकसित भारत संकल्प यात्रा येणार ही माहिती दिली नाही त्यामुळे कनेरगाव नाका येथील ग्रामस्थ व लाभार्थी हे उपस्थित न राहता ग्रामपंचायतीकडे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.