बापू मुळीक तालुका प्रतिनिधी पुरंदर
स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कार वितरण समारंभ येथील भारत मंडपम प्रगती मैदान नवी दिल्ली येथे दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी पार पडला.यावेळी सासवड नगर परिषदेस स्वच्छ सर्वेक्षण 2023 चा देश पातळीवर स्वच्छ शहर प्रथम क्रमांकचा पुरस्कार महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री श्री हरदीप सिंग पुरी व श्री मनोज जोशी सचिव, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला सदर कार्यक्रमास पुणे जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री राजेश देशमुख, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, तत्कालीन मुख्याधिकारी श्री निखिल मोरे,आरोग्य विभाग प्रमुख श्री मोहन चव्हाण यांनी सदर पुरस्कार स्वीकारला. यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप उपस्थित होते.