संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर – भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि इंदापूर व्यायाम मंडळ कबड्डी संघाच्या वतीने येथील कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये नमो चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि.12 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले आहे. या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
नमो चषकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडू व युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.खेळाडू आणि क्रीडाप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे यावेळी आवाहन करण्यात आले आहे.