अमोल सावंत
तालुका प्रतिनिधी केज
दि. 14 डिसेंबर सविस्तर व्रत्त असे की केज तालुक्यातील नांदुर घाट येथे जीवन प्रगती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात
दि.१४ डिसेंबर २०२३ रोजी केज तालुका विधी सेवा समीती व वकीलसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन सकाळी ९-३० वाजता करण्यात आले.या
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी केज न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.व्ही.पावसकर मॅडम होत्या.तसेच प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी श्री.राजेंद्र मोराळे,केंद्रप्रमुख डोईफोडे सर,प्राचार्य काणे सर,प्रा.घुलेसर,प्रा.मोराळे, प्रा.संगीता हंगे,गडदे सर, पवार,गावातील सरपंच श्री.जाधव,तसेच अॕड. डी.टी.सपाटे,अॕड.एस.व्ही.मिसळे,अॕड घोडके, अॕड.व्ही.बी.पाटील आदीची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्र संचालन अॕड.एस.व्ही. मिसळे यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना अॕड.डी.टी.सपाटे यांनी केली.आपल्या प्रास्ताविक पर भाषणात अॕड.डी.टी. सपाटे यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून देत उपस्थितांना व्यसनाधीनते कडे न वळण्याचा मोलाचा सल्ला दिला.यावेळी पोलिस उपनिरीक्षक श्री.राजेश पाटील यांनी महीला वरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या विषयी सविस्तर अशी माहिती उपस्थितांना दिली.आपल्या सविस्तर माहितीपूर्ण अध्यक्षीय भाषणात श्रीमती एस. व्ही.पावसकर मॅडम यांनी (पोक्सो) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा-२०१२ हा रॕगींग गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी लागू केलेला विशेष कायदा असल्याचे सांगितले.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,पोक्सो कायद्यान्वये या गुन्हयात पिडीत बालिकेचे नाव उघड केले जात नाही.तसेच तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिस पिडीत व्यक्तीच्या घरी साध्या वेशात जातात न्यायालयात खटलादाखल केल्यावर इन कॅमेरा साक्ष नोंदवली जाते,सुनावणी च्या दरम्यान पिडीत व्यक्ती आणी आरोपी समोरासमोर येणार नाहीत याची काळजी घेतली जाते.पिडीत बालकाची वैद्यकीय तपासणी पालकांच्या किंवा बालकांचा विश्वास असलेल्या प्रौढाच्या उपस्थितीत केली जाते. तसेच यामध्ये २० वर्षाची शिक्षा सह कठोर शिक्षा केली जाऊ शकते.जर कोणी खोटी केस दाखल केली तर त्यास सहा महिन्याची शिक्षाठोठावली जाते.या कार्यक्रमाचे आभार श्री.पठाण सर यांनी मानले.कार्यक्रमास विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचा-यांसह एकूण ५६० लाभार्थी उपस्थित होते.