अमोल बावनकर सरपंच येणोली माल यांची निवेदनाद्वारे मागणी
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील येनोली माल येथे आज चंद्रपूर जिल्हा परिषद चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी संग्राम शिंदे यांचा आज नागभीड तालुक्यात दौऱ्यावर असताना येनोली माल येथील अंगणवाडी केंद्राला आकस्मिक भेट दिली असता, येणोली येथील सरपंच अमोल बावनकार यांनी ग्राम पंचायत येनोली माल अंतर्गत जंगलव्याप्त आदिवासी बहुल असलेल्य गाव धामणगाव या गावातील लोकसंख्या 254 असून 134 एवढी लोकसंख्या असलेला आदिवासी समाज (एस टी) आहे मात्र येथील अंगणवाडी मध्ये ए पि जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना लागू नसल्याने येथील आदिवासी गरीब मागासवर्गीय लाभार्थ्यांना व गरोदर स्तनदा माता यांना पोषक आहार मिळत नाही. धामणगाव माल येथे अर्ध्यापेक्षा जास्त वस्ती आदिवासी समाज असून धामणगाव माल हे गाव आदिवासी विभागात मोडत नसल्याने हे गावात ए पि जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेपासून वंचित आहे. तेव्हा ए पि जे अब्दुल कलाम आहार योजना लागू करावी यासाठी ग्राम पंचायत येनोली माल च्या वतीने येथील लोकनियुक्त सरपंच अमोल बावनकार यांनी आज उप मुख्यकार्यकारी अधिकारी संग्राम शिंदे यांना निवेदन देण्यात आला. त्यावेळी राजेंद्र ठोंबरे महिला व बालकल्याण विकास प्रकल्प अधिकारी नागभीड हे उपस्थित होते.