शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधी पिप्री खुर्द
पिप्री खुर्द : सातपुड्याच्या पायथ्याजवळली गाव-शेत शिवारात गत दोन महिन्यापासून पट्टेदार वाघाने घातलेल्या धुमाकूळने काही दिवसा पर्वी दुर्योधन जवंजाळ यांच्या शेतात वागे तोडत असताना त्यांना वाघ दिसून आला त्याला गावातील काही लोकांनी सुद्धा पहिल वण विभागाच्या काही लोकांनी सुद्धा पहिल असाच जर वाघ दिसत राहिला तर लोकांमधे दहशत पसरत आहे शेत मजूर सुद्धा शेतात जाण्यास टाळाटाळ करत असून आज,पुन्हा त्याने दर्शन दिले आहे दोन हरीनीचा वाघाने फडशा पाडल्याची घटना आज २९/८/२०२१ सकाळी सकाळी बंटी पाटील मगर यांना यांच्या शेतात दोन हरीण मृत आवस्थेत आढळून आल्या. अकोट तालुक्यांतील सातपुडा पर्वत रांगाच्या पायथ्याला लागून असलेल्या शेतशिवारात दोन महिन्यापासून पट्टेदार वाघ दिसत असून, वनविभागाने त्याला जेरबंद करण्यासाठी सापळे लावले . पण तो जाळ्यात अडकला नाही.
याचं परिसरातील एदलापुर गावात ही तो दिसून आल्याने गावक-यांमधे दहशत निर्माण झाली. अनेकांनी रात्रीला गस्त दिली परंतू आज एका शिवारातील दोन हरणीचा पट्टेदार वाघाने फडशा पाडल्याने एकच खळबळ उडाली. वनविभाग याची काय दखल घेणार याची सर्व गावकरी मंडळी वाट पाहत आहेत