कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : दि.८.३.२०२३येथील श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. समीक्षा अखिलेश अग्रवाल हिला निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. गोपिका गावंडे महाविद्यालय उमरखेड इंग्रजी विभागाच्या अंतर्गत आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते .”तरुणांकडून इंटरनेटचा वापर आणि गैरवापर आणि त्याचा जीवनावर होणारा परिणाम “या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती या निबंध स्पर्धेमध्ये श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय पुसद कला शाखेची कु समीक्षा अखिलेश अग्रवाल बी.ए.भाग तीन या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांक मिळाला असून पुरस्कार स्वरूपात तिला रोख एक हजार रुपये व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वंदना वानखेडे करियर कट्ट्याचे समन्वयक डॉ. रंजना जीवने , विद्यार्थिनी मंडळाचे समन्वयक प्रा. विक्रांत कृष्णराव मेश्राम यांनी कु समीक्षाचे अभिनंदन करताना निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचे महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, अध्यापकेत्तद्ल कर्मचारी व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कु. समीक्षा चे निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक येणे हे आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. इतर विद्यार्थिनींनी अशीच प्रगती करावी असे मनोगत याप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. वंदना वानखेडे यांनी व्यक्त केले.