सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
कुंडलवाडी शहरातील संविधान प्रेमी व आंबेडकरवादी नागरिकांनी परभणी येथे घडलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ व या घटनेच्या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूची कसून चौकशी करून आरोपीवर कडक कार्यवाही करण्यात यावे यासाठी उपजिल्हाधिकारी बिलोली, तहसीलदार बिलोली, सहायक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे कुंडलवाडी येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.परभणी शहरातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना दिनांक १०डिंसेबर २०२४ रोजी करण्यात आली होती,या घटनेचे पडसाद परभणी शहारासह संपूर्ण महाराष्ट्रात पडले. या प्रकारनी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून संविधान प्रेमी तरुणांना अटक करून पोलीस कोठडीत ठेवले, त्यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणांनाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. सदरील मृत्यूचे कसून चौकशी करून आरोपीवर कडक कार्यवाही करण्यात यावे व घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार गजानन शिंदे,सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे,यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर सिध्दार्थ कांबळे,अमरनाथ कांबळे,गौतम वाघमारे,राहुल कुंडलवाडीकर, आकाश हातोडे,प्रथमेश कांबळे,साईनाथ गायकवाड,राजरतन कांबळे,किरण डुमणे, सुगत हातोडे, गणेश गांजरे,विक्की वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.