अमोल सावंत
तालुका प्रतिनिधी केज
दि.14 डिसेंबर सविस्तर व्रत्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी केंद्र लव्हुरी या शाळेत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची जयंती साजरी करण्यात आली.दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय माननीय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन केले व अभिवादन केले.लोकनेते गोपीनाथ राव मुंडे साहेबांच्या कार्याबाबत आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी केंद्र लव्हुरी ता.केज या शाळेचे मुख्याध्यापक राजाभाऊ कदम यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लिंगराज लक्ष्मण मोहिते हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून संपत्ती सरवदे हे होते.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शाळेतील शिक्षक, गावकरी,शालेय पोषण आहार कामगार गणेश माने हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब राठोड यांनी केले व श्रीमती सोनाली भारतराव भुमकर मॅडम यांनी आभार मानले व अध्यक्षीय परवानगीने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.