प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि. १४ डिसेंबर पाथरी मध्ये दि.१६ डिसेंबर २०२३ पासून तहसील कार्यालय पाथरी येथे महाराष्ट्र ब्राह्मण समाजाच्या वतीने प्रकाश केदारे हे अन्न त्या उपोषणास बसणार आहेत ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्या व ब्राह्मण समाजास भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळवे यासाठी पाथरी तहसील या ठिकाणी अन्नत्याग उपोषण करत आहेत प्रकाश केदारे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी असे सांगितले की २०वर्षापासून ब्राह्मण समाजाने विविध मागण्यांसाठी अनेक आंदोलने ,उपोषणे, संप, मोर्चे, इत्यादी खूप काही करत आले आहे आणि करत पण आहेत ब्राह्मण समाजाला वीस वर्षापासून आम्ही ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करू स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ देऊ असेच म्हणत कित्येक सरकार आले आणि गेले तरी पण ब्राह्मण समाजाला एकाही सरकारने भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ सोडा पण एकही मागणी समाजाची मान्य केली नाही. निवडणुका आल्या की समाजाला नुसते आश्वासन देतात प्रत्यक्षात कुठल्या सरकार काही करत नाही. परवा झालेल्या अधिवेशनात सरकारने प्रत्येक समाजाला महामंडळे दीली पण ब्राह्मण समाजाला काहीही दिले नाही. म्हणून आज ब्राह्मण समाजाला रस्त्यावर बसून उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आणि ब्राह्मण समाजावर ही वेळ केवळ सरकारनेच आणलेली आहे. कित्येक वर्षापासून ब्राह्मण समाज मागणी करतोय मंत्री, आमदार ,खासदार, यांच्याकडून पण आश्वासन मिळत आहेत. पण प्रत्यक्षात कोणीही ब्राह्मण समाजाच्या मागण्याविषयी गांभीर्याने दखल घेत नाहीत. आज ब्राह्मण समाज खरोखरच मागासलेला आहे. आरक्षण नाही मुले, मुली शिकत आहेत. नोकरी नाही. कुठलीहीस ब्राह्मण समाजाच्या मुलांसाठी योजना नाही. शिकून पण काही उपयोग नाही उद्योग नाही म्हणून तरुण मुलांमध्ये नैराश्य येऊन कित्येक समाजातील मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ज्या मुलांनी नोकरी नाही आरक्षण नाही म्हणून आत्महत्या केल्या आहेत याला जबाबदार कोण असा सवाल प्रकाश केदारे यांनी बोलताना केला. आज ब्राह्मण समाज हलाखीचे जीवन जगत आहे .जो ब्राह्मण समाज खेड्यापाड्यात राहून पोटाची गुजरान करत होता तो ब्राह्मण समाज आज खेड्यापाड्यातून निघून जात आहे यामागचे कारण ब्राह्मण समाजाचे खेड्यात एकच घर असल्यामुळे खेड्यातील काही उडान टप्पू लोक विनाकारण ब्राह्मणाचा छळकरत आहेत. नाही नाही ते लानछन ब्राह्मणांना लावत आहेत. राजकारणात नेते पण ब्राह्मण समाजाची स्टेजवर निंदा करत आहेत कित्येक समाजामधून नोकरी क्षेत्रात असणाऱ्या ब्राह्मण बांधवांना टार्गेट करून त्रास दिल्या जात आहे या साठी कडक कायदा सरकारने करावा व ब्राह्मण समाजाची विनाकारणहोणारी बदनामी थांबवावी अशा अनेक मागण्या ब्राह्मण समाजाच्या आहेत. पोरहित्य करणाऱ्या ब्राह्मणांना किमान ५००० रुपये मानधन दरमहा देण्यात यावे ब्राह्मण समाजाच्या देवस्थानच्या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये कराव्यात. म्हणजे ब्राह्मण समाजाला थोडा बहु आधार होईल. कित्येक ब्राह्मणांकडे शेती आहेत. पण त्यांना विमा किंवा इतर सरकारच्या योजनेचा लाभ शेतीवर होत नाही. म्हणून ब्राह्मण समाजाला शेती असून नसल्यासारखी आहे त्या जमिनी वर एक मध्ये कराव्यात. अशा समाजाच्या अनेक मागणी आहेत त्या सरकारने त्वरित पूर्ण कराव्यात व ब्राह्मण समाजास भगवान परशुराम आर्थिक महामंडळ त्वरित द्यावे जोपर्यंत सरकार ब्राह्मण समाजाच्या मागण्या संदर्भात जीआर काढणार नाही किंवा लेखी आश्वासन जीआर काढू म्हणून देणार नाही तोपर्यंत प्रकाश केदारे हे अन्नत्याग उपोषण करत आहेत या उपोषणास महाराष्ट्रातून विविध संघटना व समाज बांधव यांच्यातून उपोषणा आधीच जाहीरपाठिंबा येत आहे प्रकाश केदारे यांच्याशी बोलताना यांनी अशी आवाहन केले आहे की जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत सर्वांनी एकजूट होऊन सहकार्य करावे अशी विनंती सर्व समाज बांधवांना केली आहे.









