अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
दिवाळी निमित्त गावातील ग्राम पंचायत,शाळा,अंगणवाडी,छत्रपती शिवरायांचा पुतळा , वसंतराव नाईक प्रतिमेचा परिसर यांसह विविध ठिकाणी दिव्यांची आकर्षक रोषणाई करून माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम सर यांच्या संकल्पनेतून आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यात आली.उमरखेड तालुक्यातील स्मार्ट ग्राम पंचायत असलेल्या नागापुर(प)येथे माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम सर यांच्या संकल्पनेमधुन ज्या प्रमाणे आपल्या घरांमध्ये दिवाळी सणामध्ये दिव्यांची आरास केल्या जाते त्याचप्रमाणे गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा,ग्राम पंचायत कार्यालय,जिल्हा परिषद शाळा,वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचा परिसर,अमृत महोत्सव शिलालेख,रोजगार हमी योजना फलक या ठिकाणी दिवाळी निमित्त रंगबिरंगी विद्युत दिवे,दिव्यांची आरास,रांगोळी काढून व पुजन करून आगळ्यावेगळ्या प्रकारे दिवाळी साजरी करण्यात आली.यावेळी गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.