व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी, अहेरी
अहेरी गुप्त माहिती नुसार चंद्रपूर वरून महागाव मार्गे तेलंगणाला जात असलेला एका इंडिगो कारसह 80 हजार रुपये किमतीची देशी दारू साठा अहेरी पोलिसांच्या वतीने सापळा रचून जप्त करण्यात आल्याची घटना घडली.एसपी नीलोत्पल, अतिरिक्त एसपी यतीस देशमुख, एसडीपीओ सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तथा स्थानिक पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांच्या आदेशान्वये पोऊनी मरसकोल्हे , पोहवा शेंडे , पोना धर्मेंद्र मेश्राम, मपोशी पाटील यांनी पोस्टेचे सील किट साहित्य घेऊन स्टेडाला नोंद करून वांगेपल्ली येथील नदीच्या पुलीयावर नाकेबंदी केली असता चंद्रपूर निवासी संजय आगबत्तनवार, वय 52, धंदा- मजुरी याला देशी दारूच्या दहा बॉक्स अशा 100 शिलबंद निपासह इंडिगो गाडी पकडण्यात आली.
गाडी पुलियाजवळ येत असताना पोलिसांनी थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी मागे गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलागाअंती गाडी सोडून एक फरार तर एकाला अटक करण्यात आली. पंचांसमक्ष कार्यवाही केली असता दुसरा फरार आरोपी नरेश राय ,चंद्रपूर यांच्या पोलिसांची पुढील अटकेची कार्यवाही होणार आहे. गाडीची किंमत 1.50 लाख तर देशी दारूची 80हजार असा एकूण 2.30 लाखाचा मुद्देमाल जप्त करून एकाला अटक तर दुसरा फरार आरोपीच्या शोधात पोलीस आहेत. दोघांवर महादाका कलम 65 (अ) 83 अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहेत.